अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- वीजबिलाच्या विरोधात राज्यभर विविध राजकीय पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. तसेच नगर शहरात देखील आंदोलन करण्यात आले होते. मात्र हे आंदोलन हिंसक झाले होते.
शहराच्या मध्यभागी असलेल्या तेलीखुंट पावर हाऊसमध्ये दादागिरी करत अधिकार्यांसह कर्मचार्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखील धंगेकर असे मारहाण करणार्या आरोपीचे नाव आहे. अमोल शेळके यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पावर हाऊसमध्ये ही घटना घडली.
शेळके हे वायरमन असून बापू बडेकर हे कंत्राटी कर्मचारी आहेत. रात्री हे दोघे पावर हाऊसमध्ये असताना धंगेकर काही कारण नसताना कार्यालयात आला. कार्यालयाच्या दरवाजावर तो लघुशंका करू लागला.
त्याला शेळके यांनी समजावले. समजावून सांगितल्याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करत त्यांनाच मारहाण केली. काही वेळाने तो हातात चाकू घेऊन आला. चाकू मारण्यासाठी त्याने शेळके यांच्याकडे धाव घेतली असता बडेकर यांनी त्याला ढकलून दिले.
ही बाब बडेकर यांनी सहाय्यक अभियंता पालवे यांना कळविली. पालवे यांनी पावर हाऊसमध्ये धाव घेतली. त्यांनी धंगेकर यास समजावून सांगितले, पण त्यांनाही धंगेकर याने शिवीगाळ करत मारहाण केली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved