बसमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा प्रवासादरम्यान बसमध्येच मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-बारामतीहून भूमकडे जाणारी बसमध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बारामतीहून भूम येथे जाणारी बस (एम.एच.१४ बी.टी. १५७७) जामखेड मार्गे जात असताना

शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास खडकत ता. आष्टी येथे आली असता एक वृद्ध व्यक्ती बसमध्ये चढला तो जामखेड तालुक्यातील पाटोदा(गरड) येथे उतरणार होता.

चालकाने गाडी थांबविली असता वाहकाने त्यांना आवाज दिला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने वाहक त्याच्या सीटजवळ गेला असता त्याच्या तोंडाला फेस आल्याचे दिसून आले. सदर बस चालकाने बस सरळ जामखेड पोलीस स्टेशनमध्ये नेली.

पोलिसांनी त्या वृद्ध व्यक्तीला जामखेड रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक सहीने यांनी त्यांस मृत घोषित केले. या वृद्धाची ओळख पटलेली नसून जर या व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment