निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरु असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारुची विक्री करणाऱ्यांविरुध्द धडक कारवाई सुरु आहे. त्यांच्याकडून ६ लाख ८० हजार ८०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

विधानसभा निवडणूकीच्या काळात अवैद्य दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अधिकारी व भरारी पथक कोपरगाव, नगर, श्रीरामपूरच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे.

कोपरगाव येथील के.जी.एस महाविद्यालया मागे देशी दारू- ४१७ लिटर, विदेशी दारू- १४. लिटर, बियर-१५ लि असा एकूण १ लाख ३५ हजार ४१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

तसेच इतर दोन ठिकाणी कारवाई मध्ये ३ लाख ६७ हजार ९३४ तसेच १ लाख ७७ हजार ४६५ रुपये असा एकूण जिल्ह्यात वाहनासह ६ लाख ८० हजार ८०२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment