गृहमंत्री देशमुख यांचा विखे पाटलांना खोचक टोला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच तु तु में में सुरूच असते. राजकीय मुद्दा असो कि सामाजिक एकमेकांवर टिप्पणी सुरूच असते.

नुकतेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

तीन पक्षांच्या सरकारमध्ये पदांसाठी संघर्ष सुरू असल्याची टीका विखे पाटील यांनी केली होती. त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चालला आहे. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच, असं अनिल देशमुख यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करून म्हटले.

राधाकृष्ण विखे पाटीलजी सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय. काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायला देखील खूर्ची नव्हती.

मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललाय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच, असा टोला अनिल देशमुख यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment