पंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मत देण्यासाठी मतदारांना पैशाचे आमिष दाखवून ते देण्याच्या उद्देशाने स्वत: जवळ १ लाख ५२ हजार ३०० रूपये बाळगल्याप्रकरणी तिघांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अनिल रामकृष्णा भोसले (रा.सरकोली), सोमनाथ चंद्रकांत घाडगे (रा. अन्नपूर्णानगर), दीपक त्रिंबक येळे (रा. येळे वस्ती, पंढरपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. स्थिर सर्व्हेक्षण पथक प्रमुख राहूल आप्पासाहेब बऱ्हाणपुरे (रा.रेल्वे लाईन, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
शनिवारी (दि.१९) रात्री ८ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास इसबावी परिसरात कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मत द्यावे, यासाठी मतदारांना पैसे देण्याच्या तयारीत हे लोक असल्याचे दिसून आल्याने ही कार्यवाही करण्यात आली असल्याचे नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास हवालदार मुंडे करीत आहेत.