आमदारांच्या तालुक्यातील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष सरपंचपदाची निवडीवर लागून आहे. मात्र जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एक खळबळप्रकर घडला आहे.

सरपंच निवड अगदी काही दिवसांवर आली असतानाच पारनेर तालुक्यातील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे पुणे जिल्ह्यातील खेड येथून रविवारी दुपारी अपहरण करण्यात आले. तशी तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

दरम्यान निघोज ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य गणेश कवाद व दिगंबर लाळगे यांचे खेड (जि. पुणे) येथे रविवारी दुपारी थांबले असता अपहरण करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे.

ग्रामविकास पॅनल, तिसरी आघाडी, मोरवाडी, रसाळवाडी, ढवणवाडी, पांढरकरवाडी येथील नऊ सदस्य सहलीवर होते. ते रविवारी खेड येथे थांबले होते.

आठ-दहा जणांच्या टोळक्याने शस्त्रांचा धाक दाखवून दोघांना चारचाकी वाहनातून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा निषेध म्हणून सोमवार (दि.८) पासून गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!