नगर – औरंगाबाद महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- औरंगाबाद महामार्गावरील टोल वसुलीची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतर विकासकाने महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रस्त्यावर डांबराचा थर टाकण्यात आला आहे.

त्यामुळे रस्त्यातील खड्डे बुजविले गेले आहेत. तसेच या महामार्गावरील दान्ही बाजूंच्या साईडपट्ट्या मुरुम टाकून दुरुस्त करण्यात येत आहेत. त्यामुळे अपघाताला आळा बसण्यास काहीअंशी मदत होणार आहे.

औरंगाबाद महामार्गावरील वसंत टेकड ते पोखर्डी, शेंडी, वांबोरी फाटा, टोलनाका, जेऊरपर्यंतच्या साईडपट्ट्या दुरुस्त करण्यात आल्या असून, उर्वरित कामही विकासकाने हाती घेतले आहे.

रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याने वाहनांचा वेग वाढून या मार्गावर अपघात होत आहेत. अवजड वाहने रस्त्यांच्या खाली उतरून होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही अधिक होते.

परंतु, साईडपट्ट्या दुरुस्त करण्यात येत असल्याने वाहने पलटी होण्याचे प्रमाण घटले असल्याचे काहींचे म्हणणे आहे. दरम्यान या महामार्गावर मोठे खड्डे पडले होते.

त्यामुळे वाहनांचे नुकसान होत होते. मात्र आता रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असल्याने यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe