समुद्रकिनारी फिरताना चमकले नशीब ; रातोरात झाला करोडपती

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- नशिबाचा खेळ कोणालाही समजू शकत नाही. नशिबाची साथ कधी मिळेल आणि किस्मत कधी चमकेल ते आपल्याला समजत नाही. काहीसे असेच एका मच्छिमारासोबत घडले आहे.

ज्याचे नशिब अचानक चमकले आणि तो श्रीमंत झाला. हा मच्छीमार समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत होता, त्याला एक मौल्यवान वस्तू मिळाली जी कोट्यवधी रुपयांची आहे. चला या मच्छीमारची कहाणी जाणून घेऊया जो रातोरात करोडपती झाला.

मच्छीमारला काय मिळाले ?;-  थायलंडचा एक मच्छीमार आपल्या भावासोबत समुद्र किनाऱ्यावर फिरत होता, तेव्हा त्याला एक दुर्मिळ मोती (नारंगी मोती) सापडला. या मोत्याची किंमत 330,000 डॉलर (भारतीय चलनात रु. 2.40 कोटी) पेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. हे दोघे भाऊ 27 जानेवारीला थायलंडमधील नाखों सी थम्मरात किनाऱ्यावर फिरत होते तेव्हा त्यांना मौल्यवान मोती दिसला.

वडिलांनी मौल्यवान मोत्याबद्दल माहिती दिली :- न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, 37 वर्षीय Hatchai Niyomdecha आणि 35 वर्षीय Worachat Niyomdecha यांनी खाण्यासाठी तीन घोंघे (शिंपले असणारे गोगलगाय ) फोडले आणि ते घेऊन घरी आले. पण जेव्हा वडिलांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी सांगितले की त्या भावांना खरोखर एक खास नारिंगी मोती मिळाला आहे जो फारच दुर्मिळ आहे. याचे वजन 7.68 ग्रॅम असते.

 नशिबाने मिळाला खजिना:- Hatchai चा असा विश्वास आहे की हे नशीबच होते ज्यामुळे त्याला अनमोल खजिना मिळला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोती मिळण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी त्याने पांढऱ्या लांब मिश्या असलेला एक म्हातारा पाहिला होता , ज्याने त्याला एक उपहार घेण्यासाठी समुद्रकिनारी येण्यास सांगितले होते. त्यांना असे वाटते की मोती शोधण्यासाठी त्या वृध्दानेच त्यांना प्रेरित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News