मोहटादेवी प्रकरण ; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मंदिराच्या कामावेळी अंधश्रद्धेच्या नावाखाली सुमारे 2 किलो सोने पुरून त्यावर मंत्रोच्चारासाठी 25 लाख रुपये खर्च करण्यात आला होता.

आता याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करून ही कारवाई केली आहे.

दरम्यान या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान या prakrni पंडित प्रदीप जाधव आणि माजी विश्वस्त संदीप पालवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. . नेमके प्रकरण काय? जाणून घ्या पाथर्डी तालुक्यात असलेले मोहटा देवी देवस्थान प्रसिद्ध आहे.

2010 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. यावेळी मंदिर बांधताना मंदिराच्या पायामध्ये अठराशे नव्वद ग्रॅम सोने पुरले. हे सोने पुरताना त्याच्यावर मंत्रोच्चार देखील करण्यात आला होता.

या सर्व प्रक्रियेसाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च करण्यात आला. हे सर्व अंधश्रद्धेमुळे केल्यामुळे तत्कालीन विश्वस्त प्रकाश गरड यांनी आवाज उठवला आणि न्यायालयात याचिका दाखल केली.

अंधश्रद्धेच्या नावाखाली मोहटादेवी मंदिरात दोन किलो सोने पुरून त्यावर मंत्रोच्चाराच्या नावाखाली 25 लाख रुपये खर्च केल्याने दोषींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe