अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- गृहनिर्माण संस्थेत सरकारी कर्मचार्यांना घर विकत घेण्याची चांगली संधी आहे. असे सांगून संभाजी जाधव यांना एक लाख तीन हजार पाचशे रुपयांना लुबाडल्याची घटना राहुरी येथे घडली.
याबाबत राहुरी पोलिसांत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संभाजी सयाजी जाधव (वय 58 वर्षे, धंदा नोकरी, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जय भवानी सहकारी गृह निर्माण संस्था, राहुरी यामार्फत सरकारी कर्मचार्यांना फ्लॅट खरेदी करण्याची संधी आहे.
त्यावेळी संभाजी जाधव यांनी संस्थेचे सदस्य होऊन स्कीम अंतर्गत फ्लॅट खरेदी करण्यासाठी सहकार व पणन वस्त्रोदयोग विभाग मुंबई, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्याकडून 3 लाख ४५ हजार रुपये इतके कर्ज मंजूर केले.
त्यापैकी 1 लाख 3 हजार 500 रुपये इतका हप्ता जय भवानी सहकारी गृह निर्माण संस्थेचे अकाऊन्टवर आरोपींनी जमा करुन घेतला.
दरम्यान काही काळानंतर जाधव यांनी गृहनिर्माण संस्थेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मंजूर झालेले कर्ज रद्द न करता व घेतलेला हप्ता पुन्हा न भरल्यामुळे जाधव यांनी वेळोवेळी आरोपींना लेखी व तोंडी कळवूनही कर्ज रद्द करुन घेतले नाही.
तसेच घेतलेला हप्ता पुन्हा भरला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर जाधव यांनी तात्काळ घडलेला प्रकार राहुरी पोलिसात सांगितलं.
त्यानुसार आरोपी पंकज कृष्णा घरत (रा. अशोक स्तंभ, नाशिक), नितीन कदम (रा. डोंगरगण हल्ली रा. नाशिक) तसेच अहमदनगर येथील कुलकर्णी नामक इसम या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved