चिचोंडी पाटीलच्या सरपंचपदी भाजपचे मनोज कोकाटे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे नगर तालुका अध्यक्ष मनोज राधाकीसन कोकाटे 12 विरुद्ध 3 मतांनी विजयी झाले.

तर उपसरपंचपदासाठी कल्पना भाऊसाहेब ठोंबरे या विजयी झाल्या. निवडणूक अधिकारी शाखा अभियंता शिवाजी राऊत यांच्या उपस्थितीत सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालय चिचोंडी येथे पार पडली.

विरोधी पक्षाचे शरद खंडू पवार यांचे गटाच्या सौ. मनीषा ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी सरपंच पदाची तर उपसरपंचपदासाठी दत्तू धुळे यांनी निवडणूक लढविली.

दोघांना प्रत्येकी 3 मते पडली.एकूण 15 सदस्य संख्या आहे.सरपंच उपसरपंच पदाची निवड झाल्यानंतर गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe