पोलिसांना टेन्शन त्या फरार आरोपीचे

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपी अतुल उर्फ बबन भाऊसाहेब घावटे (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) याला ताब्यात घेतल्यानंतर केवळ चौकशी करून एलसीबीने त्याला सोडून दिले.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करणे, गुन्ह्यांचा शोध घेणे हेच स्थानिक गुन्हे शाखेचे मुख्य काम आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे राज्यभरात नेटवर्क असते.

त्यामुळे त्यांच्या नजरेतून सहजासहजी आरोपी सुटू शकत नाही. येथे मात्र ताब्यात घेतलेला आरोपी सहीसलामत सुटतो. याच्यामागचे काहीतरी कारण आहे.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्याकडे खुलासा मागितला आहे.

आता ते काय खुलासा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान घावटे हा सराईत गुन्हेगार असल्याचे नगर आणि पुणे पोलिसांना त्याच्या गुन्ह्यांबाबत चांगलीच माहिती आहे. असे असताना एलसीबीच त्याच्या मोक्काच्या गुन्ह्याबाबत अनभिज्ञ कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.