अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- पुणे शहरात गुन्हेगाराच्या हत्येची धक्कादायक घटना घडली असल्याचे समोर आले आहे. ‘गोल्डमॅन’ म्हणून मिरवणाऱ्या सराईत गुन्हेगार सचिन शिंदे याची पुण्यातील लोणीकंद गावात भर रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान घडलेली घटना अशी कि, सचिन नानासाहेब शिंदे ( वय २९ वर्ष, रा. लोणीकंद, ता.हवेली) ग्रामपंचायत कार्यालयातून काम करुन बाहेर आल्यानंतर एटीएमसमोर सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या लोकांनी गोळीबार केला. डोक्यात गोळी लागून शिंदे रक्तबंबाळ होऊन खाली पडला.
घटनेनंतर मारेकरी दुचाकीने वेगाने फरार झाले. शिंदे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास जखमी अवस्थेत रुबी हाॅस्पिटलला दाखल केले गेले. पण उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.लोणीकंदमध्ये ही घटना घडल्या नंतर तणावाचे वातावरण आहे.
लोणीकंद पोलीस निरिक्षक प्रताप मानकर पुढील तपास करीत आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. शिंदे हा गुन्हेगारी प्रवृतीचा होता आणि गोल्डमॅन म्हणूनही ओळखला जात होता.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved