तिचा नकार झाला असह्य; प्रियकराची ‘प्रपोज डे’च्या दिवशीच आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-सध्या सर्वत्र गुलाबी वारे वाहू लागले आहे…. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे व्हॅलेंटाईन… आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुणाई कित्येक महिन्यांपासून या दिवसांची वाट पाहत असतात.

या दिवसांमध्ये तरुणाई आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. अनेकदा काही प्रेम प्रकरणे जुळतात तर काही विस्कटातात.

नुकतेच ‘प्रपोझ डे’च्या दिवशी नाशिकमधील इंदिरानगरमध्ये तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळं तरुणाने गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील इंदिरानगर परिसरात राजसारथी सोसायटीमध्ये राहणारा अजय थोरात हा 25 वर्षीय तरुण आपल्या मित्रासमवेत भाडेतत्वावर राहत होता.

8 जानेवारीला संध्याकाळी अजयचा मित्र घरी आला असता अनेक वेळा दार ठोठावूनही अजय दार उघडत नसल्याने त्याने स्थानिक रहिवासी तसेच पोलिसांना याठिकाणी पाचारण केले.

पोलिसांनी शिडीच्या सहाय्याने वर चढत खिडकीतून आत डोकावून पाहिले असता सिलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत अजयचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास केला असता अजयचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्या मुलीसोबत लग्न करण्याची त्याची ईच्छा होती.

मात्र, तिने लग्नास नकार दिल्याने अजय काही दिवसांपासून नैराश्यात होता आणि याच कारणामुळे त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याच प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

दरम्यान, अजयच्या मागे आई, वडिल, दोन बहिण, दोन भाऊ आणि दाजी असा त्याचा परिवार आहे. त्याचे कुटुंबीय सध्या पुण्यात स्थायिक आहेत.

अजयने उचलेल्या धक्कादायक पावलामुळं त्याचे कुटुंब कोलमडून गेलं आहे. तसंच या प्रकरणासंदर्भातील पुढील तपास इंदिरानगर पोलिस स्टेशनमधील उपनिरीक्षक हादगे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe