ऊर्जामंत्री ना. तनपुरे म्हणतात शेतकऱ्यांनी ‘त्या’ योजनेचा लाभ घ्यावा!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-कृषी पंप वीज जोडणी तथा थकबाकी वसुली धोरण २०२० च्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने वीजजोडणी देणे.

वीजबिलातील थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्कात सवलत मिळणार आहे. या माध्यमातून सवलतीनंतर पहिल्या वर्षी उर्वरित ५० टक्के थकबाकी भरल्यास राहिलेली बिलाची रक्कम माफ होणार आहे.

शेतकऱ्यांनी या योजनेस प्रतिसाद द्यावा. तसेच महावितरणने  या योजनेची  माहिती व लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून ही योजना गतिमानतेने राबवून  यशस्वी करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी दिले .

कृषिपंप वीजजोडणी धोरणा योजनेअंतर्गत ग्राहकाने भरणा केलेल्या रकमेपैकी ३३% रक्कम  ग्राहकाच्या ग्रामपंचायत क्षेत्रामधील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे.

तसेच ग्राहकाच्या भरणा रकमेपैकी आणखी ३३टक्के रक्कम ही ग्राहकाच्या जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे. संपूर्ण कृषी क्षेत्राचा कायापालट करणाऱ्या या धोरणाचा व योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe