अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-खुनाच्या गुन्ह्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबीत झालेले भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. प्रवीण पाटील यांच्या मालमत्तेची चौकशी करुन, गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल व्हावा व त्यांचे कायमचे निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. भिंगार येथे रमेश उर्फ रमाकांत काळे या इसमाचा २०१७ साली खून झाला.मात्र त्यांना न्याय मिळाला नाही.
प्रवीण पाटील व त्यांच्या सहकार्यांनी हे प्रकरण आर्थिक आमिषाला बळी पडून दडपण्याचा प्रयत्न केला. सहा. पो.नि. पाटील हे जातीयवादी प्रवृत्तीचे असल्याने ते नेहमीच दीन-दुबळ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.
सहा. पो.नि. पाटील यांच्या कार्यकाळात असे अनेक प्रकार घडले असून, त्यांची खातेनिहाय सखोल चौकशी होण्याची गरज आहे. भिंगार कॅम्पला कार्यरत असताना
सहा. पो.नि. पाटील यांनी मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती कमवली असून, पाटील व त्यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण मालमत्तेची चौकशी करण्यात यावी.
काळे खून प्रकरणात हलगर्जीपणा करुन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल व्हावा व त्यांचे कायमचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved