मुख्यध्यापकाकडून शिक्षिकेचा विनयभंग; या ठिकाणी घडली घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाने सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना शिर्डी मध्ये घडली आहे. गंगाधर विश्वनाथ वरघुडे (वय 52) रा. शिर्डी असे या मुख्यधायपाकाचे नाव आहे.

दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मुख्याध्यापका विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डी संस्थानच्या महाविद्यालयात संबधीत महिला शिक्षिका गेल्या पाच वर्षापासून नोकरी करत असून

या शिक्षिकेने शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे हा वेळोवेळी वाईट नजरेने बघणे, कामाच्या ओघात शरीर स्पर्श करणे, कार्यालयात गेल्यावर वाईट हेतूने पकडणे अशी कृत्य करत होता.

याबाबत वरिष्ठांना माहिती दिली होती. मात्र कठोर कारवाई न झाल्याने त्याचे धाडस वाढतच गेले. दि. 6 फेब्रुवारी 2021 रोजी दोन वाजेच्या सुमारास ड्युटीवर असतांंना मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे याने काम आहे, असे सांगत कार्यालयात बोलावले व मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली.

त्यास नकार दिला असता जबरदस्ती केली. मी मदतीसाठी ओळखीच्या शिक्षकेला विनंती केली असता त्यांनी देखील सरांना असे करू नका असे सांगितले.

त्यावेळी त्यांनी झालेला प्रकार कोणाला सांगितला तर संपवून टाकीन माझ्या राजकीय ओळखी फार आहेत. त्यामुळे कोणाला काही सांगू नका अशी धमकी दिली, अशी फिर्याद शिक्षिकेने शिर्डी पोलिसात दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी मुख्याध्यापक गंंगाधर वरघुडे याच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe