अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून अनेक ठिकाणी सरपंच तसेच उपसरपंच पदांची घोषणा देखील झाली आहे.
नुकतेच राहुरी तालुक्यातील उर्वरित १४ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडी झाल्या असून भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सर्जेराव घाडगे यांची कनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झालेली आहे.
तर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या निर्मला मालपाणी यांची राहुरी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली आहे. महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सात्रळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सतीश ताठे यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या ग्रामपंचायतीचे नावे व सरपंच उपसरपंच यांची नावे पुढील प्रमाणे: सात्रळ- ग्रामपंचायत सरपंचपदी सतीश बबन ताठे तर उपसरपंचपदी आयनुमा मुस्ताक तांबोळी,
तिळापुर – सरपंच सुधाकर धर्माजी जाधव,उपसरपंच लताबाई बाळकृष्ण आचपळे,कनगर बु. – सरपंच – सर्जेराव गोरक्षनाथ घाडगे,उपसरपंच- बाबासाहेब भास्कर गाढे,करजगाव – सरपंच – शनिफ नाजिरभाई पठाण, उपसरपंच – गणेश दिगंबर कोतकर,वडनेर – सरपंच – लताबाई आप्पासाहेब बलमे,उपसरपंच मच्छद्रिं सजाबापू बलमे.
वळण ग्रामपंचायत- एकनाथ ज्ञानदेव खुळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली, तर सरपंच पद रिक्त,पिंपळगाव फुनगी – वडितके रामभाऊ भिवसेन सरपंचपदी बिनविरोध निवड झाली, तर उपसरपंच जाधव नंदा हेमंत यांची बिनविरोध निवड,पिंप्री अवघड- सरपंच रेखा बापू पटारे, उपसरपंच तमनर लहानू उर्फ बापू सखाराम यांची निवड बिनविरोध झाली.
कोपरे – ग्रामपंचायत सरपंचपदी कविता नानासाहेब जाधव, उपसरपंचपदी प्रियंका लक्ष्मण जगताप, वरशिंदे-सरपंच श्रीम आहेर सोनाली दत्तू,उपसरपंच -श्रीम नेहे आसराबाई आप्पासाहेब, राहुरी खुर्द- सरपंच निर्मला मालपाणी, उपसरपंच तुकाराम बाचकर ,धानोरे- सरपंचपद रिक्त तसेच उपसरपंचपदी ज्ञानेश्वर संतु दिघे,
लाख – सरपंचपदी-लहानबाई आबासाहेब गल्हे यांची व उपसरपंचपदी -योगिता विजय आढाव, केंदळ बु.-सरपंचपदी-गोविंद खंडू जाधव, उपसरपंचपदी-चंद्रकला नामदेव तारडे,
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved