अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-मेडीकल चालवणेबाबत हप्तयापोटी दरमहा दहा हजार रुपये द्या, अन्यथा कोयत्याने जिवे ठार मारण्याची भिती घालून धमकी देत कोपरगाव येथे शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाला खंडणी मागणाऱ्याविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सचिन संजय साळवे (रा.गजानननगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रगती मेडीकलचे भरत आसाराम मोरे (रा. सप्तर्षीमळा) कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/05/shivsena-23_20170914676.jpg)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत मोरे यांचे सप्तर्षी मळा येथे प्रगती मेडिकल शॉपी दुकान असून राहण्यासही त्याच परिसरात आहेत. रविवारी सायंकाळी पावने आठ वाजता आरोपी सचिन साळवे मजकुर हा मेडिकलवर आला.
त्याने फिर्यादीस त्याचे मेडीकल चालवणेबाबत हप्त्यापोटी दरमहा दहा हजार रुपये मागून हातातील लोखंडी कोयत्याने जिवे ठार मारण्याची भिती घातली. शिवीगाळ करुन धमकी दिली.
या फिर्यादीवरुन भा.द.वी. कलम ३८७, ४५२, ५०४, ५०६ प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved