यांच्यासाठीच आमदार जगताप यांची जिल्हा बँक निवडणूकीतून माघार!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना जिल्हा बँकेसाठी बिगरशेती मतदारसंघातून महाविकास आघाडीकडुन उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

गायकवाड यांच्यासाठी आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या निवडणकीतून माघार घेऊन गायकवाड यांना संधी दिली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सेवा संस्था मतदारसंघातून बँकेचे विद्यमान संचालक ॲड.उदय शेळके व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले आमने-सामने उभे राहिले आहेत.

जिल्हा पातळीवरील मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रशांत सबाजीराव गायकवाड व त्यांचे वडील कृषिभूषण सबाजीराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

मागील निवडणुकीत मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडुन सबाजी गायकवाड यांना उमेदवारी मिळाली नव्हती तरी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून गेल्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. तर दुसरीकडे सबाजी गायकवाड यांचा जिल्हा पतसंस्था फेडरेशन व मजूर फेडरेशनच्या माध्यमातून  जिल्ह्यामध्ये मोठा जनसंपर्क आहे.

त्यामुळे गेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपक्ष असतानाही सबाजी गायकवाड यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र यावेळच्या निवडणुकीत सबाजी गायकवाड व प्रशांत गायकवाड यांनी बँकेच्या बिगरशेती मतदारसंघातून महा विकास आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

यावेळच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करून गायकवाड पिता – पुत्रांना न्याय मिळणार का ? याची उत्सुकता होती. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे मंत्री ना.शंकराव गडाख यांनी गायकवाड यांच्या मतदार संघाच्या संपर्काची दखल घेत त्यांना उमेदवारी देऊन त्यांना न्याय दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe