प्रलंबित प्रश्नी आमरण उपोषण; मुख्याधिकाऱ्यानी दिले आश्वासन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर नगरपरिषदसमोर घनकचरा,सेवानिवृत्त व सफाई कामगार यांच्या प्रलंबित प्रश्नावर नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण व कामगार नेते दीपक चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरु केले होते.

मात्र मुख्याधिकार्‍यांनी कामगारांचे थकीत वेतन 8 दिवसात देवू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. कामगारांच्या मागणी नुसार अ‍ॅवार्डच्याबाबतीत संबंधित वकील यांच्याशी चर्चा करून सोडवण्यात येतीलच तसेच गोंधवणी रोड येथील प्रभाग दोन मधील 63 कामगार सदनिका 2009 मध्ये कामगारांच्या नावे करण्यात आले असुन

या सदनिका रमाई आवास योजने अंतर्गत बांधकाम परवानगी, मेडिकल बिल, आणि ऊर्वरित कर्मचारी यांना शासकीय सदनिका देणे बाबत येत्या सर्व साधारण सभेमध्ये विषय पत्रिकेत घेण्यात येतील असे लेखी स्वरुपात मुख्याधिकारी यांनी दिले

तसेच शासकीय गणवेष, महाराष्ट्र बँकेमध्ये कामगारांच्या बाबतीत होणारी वेतन खात्यावर जमा करणे बाबतीत होणारी दिरंगाईबाबत लेखी पत्र व्यवस्थापक यांना देण्यात आले आहे.

पालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि कामगार यांचे नगर परिषदतर्फे पेन्शन विक्री, पदोन्नती फरक, सेवानिवृत्त 6 व्या आणि 7 व्या वेतन आयोगाचा फरक देय रक्कमा थकीत वेतन ई पोटी देय थकीत रक्कम रूपये 6 कोटी 82 लाख रूपये असुन

त्याच बरोबर माहे सप्टेंबर ते माहे जानेवारी पर्यंतचा घनकचरा कामगार यांचे थकीत वेतन रूपये 75 लक्ष रूपये असुन याबरोबरच अ‍ॅवार्डच्या कामगारांना गत् दोन दशकाहुन जास्त न्यायालयीन लढा पालिकेविरुध्द चालु असुन कामगारांच्या मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे

या सर्व प्रश्नांना मुख्याधिकारी गणेशजी शिंदे यांनी सकारात्मक भुमिका घेवुन कामगार प्रश्नावर सहानुभूती पुर्वक निर्णय घेत घनकचरा थकीत वेतन 8 दिवसात करण्याचे मान्य केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News