अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- केडगाव मध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक कार्यकर्ते केडगाव मध्ये काँग्रेस पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्यास तयार आहेत. आगामी काळात केडगावमध्ये काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी पक्ष करेल, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. त्यानिमित्त केडगाव मधील नागरिकांसाठी “मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच मास्क, बिस्किट आणि कॅल्शियम गोळ्या वाटप कार्यक्रम” आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी काळे बोलत होते. काळे म्हणाले की, केडगाव मध्ये नागरी पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न आजही मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असते.
केडगावच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेसच्या माध्यमातून आवश्यक तो पुढाकार घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.
आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शहर जिल्हा सरचिटणीस नलिनीताई गायकवाड यांच्या संकल्पनेतून गायकवाड यांच्यासह शहर जिल्हा सहसचिव नीता बर्वे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सुनीताताई बागडे, उषाताई भगत, जरीना पठाण यांनी विशेष पुढाकार घेतला होता. यावेळी सरचिटणीस नलिनीताई गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने कायम तळागाळातील समाज घटकांना बरोबर घेऊन काम केले आहे.
ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त केडगावमध्ये काँग्रेस पक्षाने आरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांना शहरातील तज्ञ डॉक्टरांची सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. नीता बर्वे म्हणाल्या की, शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्यामुळे कार्यक्रम आयोजनाचा उद्देश सफल झाला आहे. सुनीता बागडे यांनी भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम पुन्हा आयोजित केले जातील असे यावेळी सांगितले.
शिबिरामध्ये फॅमिली फिजिशियन डॉ.रेवन पवार, मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. गौरव हराळ, स्रीरोग तज्ञ डॉ. स्वाती हराळ, अस्थिरोग तज्ञ डॉ. रोहन धोत्रे, मेडिकल ऑफिसर डॉ. राहिंज, फिजीशियन डॉ. बागले, नेत्ररोग तज्ञ डॉ.ताठे यांनी आपली सेवा दिली. शिबिरामध्ये आरोग्य तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती. २७८ नागरिकांनी यावेळी शिबिराचा लाभ घेतला.
नागरिकांना या वेळी कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तर परिसरातील लहान मुलांसाठी बिस्कीट आणि खाऊचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना मोफत मास्क वाटप करण्यात आले. यावेळी सेवादलाचे डॉ.मनोज लोंढे, निजामभाई जहागीरदार, अनंतराव गारदे, फारुक शेख, कौसर खान, प्रवीणभैय्या गीते पाटील, विशाल कळमकर, अनिसभाई चुडीवाल, प्रशांत वाघ, डॉ. रिझवान अहमद, सौरभ रणदिवे, अमित भांड, प्रमोद अबुज आदी उपस्थित होते. फोटो
काँग्रेसच्या वतीने केडगाव मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये नागरिकांना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस नलिनीताई गायकवाड, शहर जिल्हा सहसचिव नीता बर्वे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सुनीताताई बागडे,
उषाताई भगत, जरीना पठाण, कौसर खान, डॉ.रेवन पवार, डॉ. गौरव हराळ, डॉ. स्वाती हराळ, डॉ. रोहन धोत्रे, डॉ. राहिंज, डॉ. बागले, डॉ.ताठे, सेवादलाचे डॉ.मनोज लोंढे, निजामभाई जहागीरदार, अनंतराव गारदे, फारुक शेख, प्रवीणभैय्या गीते पाटील, विशाल कळमकर, अनिसभाई चुडीवाल, प्रशांत वाघ, डॉ. रिझवान अहमद, सौरभ रणदिवे, अमित भांड, प्रमोद अबुज आदी उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved