शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे यांना देण्यात आले.

शहरातील उपनगरातील एकवीरा चौक तसेच बुरुडगाव परिसरातील रस्त्याने चाललेल्या महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरांनी चोरी केल्याची घटना घडली.

अशा प्रकारचे अनेक घटना घडल्या असून, शहरात मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरत असून, महिला एकट्या रस्त्याने जाण्यास घाबरत आहे. शहरात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनाविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात रोष निर्माण झाला आहे.

गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून होत नसल्याची नागरिकांची भावना असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शहरात वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे.

पोलीस प्रशासनाने हा प्रश्‍न गांभीर्याने घेऊन शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी पोलीसांच्या विविध तुकड्या नेमाव्या, पोलीसांची गस्त वाढवावी आदी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, विशाल शिंदे, नितीन लिगडे, गजेंद्र भांडवलकर,

सुमित कुलकर्णी, विक्रांत दिघे, विशाल शिंदे, निलेश घुले, लाला खान, मुजाहिद शेख, सैफअली शेख, शितल राऊत, शितल गाडे, उषाताई सोळंकी, सुनिता पाचारणे, लिलाबाई डाडर आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe