अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषात सरपंचपदाची निवडी देखील पार पडल्या.
मात्र जिल्ह्यातील एका गावी सरपंचपदाची शपथ घेण्यासाठी उमेदवार दुचाकी अथवा चारचाकीमध्ये नाही आला तर चक्क हेलिकॉप्टर मध्ये या भाऊंची एंट्री झाली.
दरम्यान जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सरपंच पदाची शपथ घेण्यासाठी खास समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच साहेबांनी शपथ घेण्यासाठी थेट हेलिकॉप्टरनेच एन्ट्री घेतली.
संपूर्ण गावातील महिला फेटे बांधून सज्ज होत्या. हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण गाव आले होते. सरपंचाचे हेलिकॉप्टरनेच एन्ट्री होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले.
बारा बैलांच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली होती. संगमनेर तालूक्यातील आंबी दुमाला या गावात हा शपथविधी सोहळा रंगला होता. तरुण उद्योजक जालिंदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत.
अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध त्यांनी करून दिला आहे. जालिंदर गागरे पुण्यात राहत असले तरी गावाशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी निवडणूक लढविली.
या निवडणुकीत संपूर्ण उमेदवार त्यांचे निवडून आले. योगायोगाने सर्वसाधारण पुरुष आरक्षण निघाल्याने आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. संपूर्ण गावाचा विकास हेच ध्येय असल्याचे जालिंदर गागरे यांनी म्हंटले आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved