धक्कादायक ! जमावाकडून पोलिसाला मारहाण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- संगमनेर तालुक्यातील वरवंडी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणुकीदरम्यान बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या पोलीस उप निरीक्षकासह पोलिसांना जमावाकडून शिवागाळ व धक्काबुकी करण्यात आल्याने १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अशोक रोहिदास गागरे (वय ५८), राजाबापू नानासाहेब वर्पे (वय ५७), संपत बाजीराव भोसले (वय २९), सुभाष रोहिदास गागरे (वय ४६), बाबासाहेब तुकाराम हारदे (वय ३९), किरण सावळेराम उगले (वय २७), अनिल लक्ष्मण उगले (वय २९), विलास सोपान वर्पे (वय ४७), सोमनाथ हरिभाऊ गागरे (वय २४),

शिवाजी लक्ष्मण गागरे (वय २६), बाळासाहेब सखाराम बकुळे (वय ३८), राहूल अशोक गागरे, इंदुबाई अण्णासाहेब वर्पे (सर्व रा. वरंवडी, ता. संगमनेर) यांसह इतर १५ ते २० अनोळखी व्यक्ती अशा एकुण ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वरवंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणूकप्रसंगी दोन गटांत उमेदवार पळवापळवी सुरु झाल्याने गावात तणावयुक्त वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवाला होता.

मात्र पोलीस आपल्याला अडकाठी निर्माण करीत असल्याचे पाहून अशोक रोहिदास गागरे व राजाबापू नानासाहेब वर्पे यांनी तणाव निर्माण करत पोलीस उपनिरीक्षक व पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ करत धक्काबुकी करण्यात आली.

याबाबत अनेकांना अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी, दमदाटी शिवीगाळ, धक्काबुकी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe