थेट घरात घुसून विवाहितेचा विनयभंग! ‘या’ तालुक्यातील घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- थेट घरात घुसून तू मला खूप आवडतेस, असे म्हणत एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध पारनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, एका गावातील विवाहित महिला घरात एकटी असताना आरोपी हा पीडित महिलेच्या घरात घुसला व तू मला आवडतेस असे म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच याबाबत तू जर तुझ्या पतीला सांगितले तर तुला व तुझ्या पतीला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.

याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe