‘या’ सरपंचाचा दारूबंदी करून कामाचा श्रीगणेशा!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथे नवनिर्वाचित सरपंच लताबाई काळे व उपसरपंच ईश्वर धर्मा पठारे यांनी पदाचा पदभार स्विकारताच गावात संपूर्ण दारुबंदी करण्याचा पहिलाच निर्णय घेतला असून त्या कामाचा श्रीगणेशाही करण्यात आला.

गावातील सर्व दारु विक्रेत्यांना तंबी देण्यात आली असून गावात कुठेही दारु विक्री आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येणार आहे. अनाधिकृत विक्री करण्यात येत असलेली देशी दारु देखील जप्त करण्यात आली. लवकरच ग्रामसभेचे आयोजन करून सर्वानुमते दारुबंदीचा ठराव मंजूर करण्यात येणार आहे.

यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या या पहिल्याच धडाडीच्या निर्णयाबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. यापुढेही गावासाठी विविध समाजहिताची कामे करण्याचे आश्वासन सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामस्थांना दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News