अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी मार्च २०२०रोजी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला.
कोरोनाचा प्रार्दुर्भाव असतांना देखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीज पुरवठा केला.एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही.
राज्यातील ४१ लाख ७हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२हजार ग्राहकांनी एप्रिल २०ते जानेवारी २१ सलग या दहा महिन्यांच्या काळात एकही वीज बिल भरले नाही,
यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ५९ हजार ग्राहकांचा समावेश असून त्यांचेकडे ३३ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीमध्ये करोडो रूपयांची भर पडली असून महावितरणला प्रचंड मोठया आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
ग्राहकांना २४७ वीजपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागत असून विजेच्या पारेषणवरही मोठा खर्च करावा लागत आहे. महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून ग्राहकांनी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २३ मार्च २० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.
त्यामुळे ग्राहकांकडे जाऊन वीजमीटरचे रिंडिग घेणे तात्पुरते बंद करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात वीजपुरवठा सुरळीत व अखंडित ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
कोरोनाच्या कालावधीत अखंडित वीजपुरवठ्यासाठी कर्तव्य बजावताना संसर्गामुळे अनेकांना प्राण गमावावे लागले.विशेष म्हणजे या १० महिन्याच्या कालावधीत थकबाकीच्या कारणावरून सर्वच वर्गवारीमधील एकाही वीजग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला नाही.
मात्र वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमिवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे.
दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. वीजग्राहकांना २४७७वीजपुरवठा सुरु आहे. मात्र दर महिन्यात होणाऱ्या वीजबिल वसुलीचे प्रमाण अतिशय कमी असल्याने दरमहा वीजखरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जांचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत आहे.
परिणामी येत्या काही दिवसात या थकबाकीमुळे वीजपुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वीजबिल भरावे असे आवाहन वीज कंपनीने केले आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved