अहमदनगर :- भारत – पाक सिमेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना अहमदनगर जिल्ह्यातील सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे.
कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती.
लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच त्यांना नायब सुभेदारपदी बढती मिळाली होती.
जवान वाल्टे त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक नववीत शिकणारी मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत.
वाल्टे यांचे प्राथमिक शिक्षण दहीगावमध्ये झाले होते. त्यानंतर कोपरगावमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले.
मंगळवारी झालेल्या कारवाईच्या वेळी गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही.
- Motilal Oswal यांची Fundamental Picks ! टॉप 5 शेअर्स देणार सर्वाधिक रिटर्न्स
- शिर्डीत धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट ! अजित पवारांना पक्षातून बाहेर करण्याचे षडयंत्र…
- बीड जिल्हा पुन्हा हादरला ! रस्त्यावर रक्ताचा सडा… तिन तरुणांचे खाकीचे स्वप्न चिरडले
- पुणेकरांसाठी खुशखबर : वाहतूक कोंडीला अखेरचा रामराम ?
- अहिल्यानगर जिल्ह्यात दोन खासगी हेलिकाँप्टर ! काय असते किंमत ?