कौतुकास्पद ! शेतकऱ्याचा पोऱ्या झाला पोलीस अधिकारी

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- जिद्द, चिकाटी, अपार मेहनत या गोष्टींवर भर दिली कि मिळणाऱ्या विजयापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे या गावचे शेतकरी कुटुंबातील अंकुश सुभाष डांगे यांनी युपीएससी परीक्षेत भारतात 97 क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे.

अंकुश डांगे यांची पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली आहे. त्यांच्या या भरीव यशामुळे कोर्‍हाळे गावच्या शिरपेचात नावलौकिकात मानाचा तुरा रोवल्याने ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिर्डीचे डीवायएसपी संजय सातव, उपसरपंच ज्ञानेश्वर डांगे, मेजर विलास थोरात तसेच अंकुशचे आई-वडील सुभाष डांगे, मथुरा डांगे व चुलते रामकृष्ण डांगे उपस्थित होते.

ग्रामपंचायतच्या वतीने डीवायएसपी संजय सातव तसेच कोर्‍हाळे गावचे भूमिपुत्र भारतीय सैन्य सैन्यदलातून निवृत्त झाल्याने विलास थोरात तसेच नुकतीच पीएचडीसाठी निवड झाल्याने अक्षय थोरात यांचाही सत्कार करण्यात आला.