अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-सततचा दुष्काळ, अतिवृष्टी आणि महापूर अशा नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे.
शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचा पाय अधिकच खोलात गेला आहे. अशा संकट काळात महावितरणें वीजबिल वसुली मोहीम राबवली आहे.
यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी (आंत्रे) येथील महावितरणकडून शेतकर्यांना शेतीपंपाचे वीज बिल भरण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शुक्रवारी महावितरणच्या येथील सबस्टेशनच्या कर्मचारी यांनी शेतीचा वीजपुरवठा बंद केला होता. दरम्यान शेवगाव तालुक्यातील अनेक शेतकरी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन येथील सबस्टेशनवर शेतीपंपाचे बिल भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी,
अशी मागणी केली. कनिष्ठ अभियंता पाडवी यांनी शेतकर्यांची मागणी मान्य करत तीन दिवस बिल भरण्यासाठी मुदत वाढवून दिली.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved