अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-आंध्र प्रदेशमध्ये रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
अपघातामध्ये जखमी झालेल्यां सध्या नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तर यामध्ये तब्बल 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे बस थेट पलटी झाली. त्यामुळे बसमधल्या 14 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी 14 मृतदेह ताब्यात घेत त्यांना शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर मृतांची ओळख पटवण्याचं कामही सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved