अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात चहावाल्याची बायको झाली गावची कारभारीण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव पारेवाडीच्या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्कंठा तालुक्याला होती. एकाच गटाचे सातही सदस्य मताधिक्याने निवडून आल्याने अप्रत्यक्षपणे सर्व सदस्यांची सरपंचपदी वर्णी लागावी, अशी इच्छा होती. शेवटी चिठ्ठी टाकून सरपंचपदाची निवड करण्यात आली.

यामध्ये तिसगाव येथे चहाची टपरी चालवत असलेले महादेव तनपुरे यांच्या सौभाग्यवती आसराबाई तनपुरे यांची आदर्शगाव पारेवाडीच्या सरपंचपदी वर्णी लागली. उपसरपंचपदी बाळासाहेब विश्वनाथ आठरे यांना संधी मिळाली. आदर्शगाव पारेवाडीच्या ग्रामस्थांना पंधरा वर्षांनंतर गावात ग्रामपंचायतची निवडणूक झाल्यामुळे मतदान करण्याची संधी मिळाली.

या निवडणुकीत अतिशय धक्कादायक निकाल लागून पंधरा वर्षे सरपंच राहिलेल्या विद्यमान सरपंचाला देखील पराभवाचा सामना या निवडणुकीत करावा लागला.

नव्याने सत्तेत आलेल्या युवा वर्गातून सरपंच उपसरपंचपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार याबाबत अंतर्गत कलह होऊ नये म्हणून चिठ्ठी टाकून सरपंच उपसरपंच निवडीचा फंडा अवलंबण्यात आला. यामध्ये आसराबाई महादेव तनपुरे यांची सरपंचपदासाठी, तर बाळासाहेब आठरे यांची उपसरपंच पदासाठी वर्णी लागली. उपस्थित सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी या निवडीचे स्वागत केले.

यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा योगेश आठरे , मनीषा गणेश लवांडे, अशोक दिनकर आठरे, राहुल बाळासाहेब भोसले, सुनीता मिनीनाथ लवांडे यांच्यासह या गटाचे प्रमुख भाऊसाहेब आठरे, चेअरमन संदीप बर्डे, युवा नेते अमोल लवांडे, शशिकांत आठरे, विशाल लवांडे,

नीलेश लवांडे, रंजन लवांडे, राम आठरे, विक्रम आठरे, गणेश लवांडे, नवनाथ तनपुरे, बाळासाहेब भोसले, कैलास आठरे यांच्यासह गावातील तरुण वर्गाने या निवडीचे गुलाल उधळून फटाके वाजवून या निवडीचे जोरदार स्वागत केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe