अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रँच रोडवरील अक्षय काॅर्नर परिसरातील कालव्यात रविवारी जुनेद झाकिर पटेल (३०, मिल्लतनगर) या तरुणाचा मृतदेह आढळला. नागरिकांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली.
शहर पोलिस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यावेळी मृत तरुणाच्या खिशात मतदान कार्ड, मोबाइलसह काही पैसे होते. याप्रकरणी शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जुनेदच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि काल सकाळच्या दरम्यान एका तरुणाचा मृतदेह पाटातून वाहून जात असताना नागरिकांनी पाहिले.
नागरिकांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलीस तात्काळ कॅनालच्या कडेला पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह अक्षय कार्नर परिसरात कालव्यातून बाहेर काढला.
त्यावेळी त्याचे खिसे तपासले असता त्याच्या खिशात मतदान ओळखपत्र आढळून आले. त्यानुसार हा तरुणाचे नाव जुनेद झाकिर पटेल (वय 30, रा. मिल्लतनगर) असे असल्याचे पोलिसांनी कळाले.
काल सकाळी अक्षय कार्नर परिसरात काही नागरिकांनी कालव्यातील पाण्यात एक मृतदेह वाहत येताना पहाताच हा मृतदेह पहाण्यासाठी गर्दी केली होती.
मयत तरुणाच्या खिश्यात मतदान कार्ड, मोबाईलसह काही पैसे मिळाल्याचे आढळून आल्याचे समजते.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दुपारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved