थकबाकी न भरल्यामुळे हाॅटेल झाले सील !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- शेवगाव नगरपरिषदेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध शनिवारपासून मोहीम सुरू केली. हाॅटेल संकेत, गारवा, तसेच आनंद कॉटेक्सने थकबाकी न भरल्यामुळे सील ठोकण्यात आले.

हॉटेल संकेतकडे ७ लाख ७२ हजार, हॉटेल गारवाकडे ५९ हजार ४१ व आनंद कॉटेक्सकडे ३ लाख ८८ हजारांची थकबाकी आहे.

जे पाणीपट्टी, घरपट्टी भरणार नाहीत, त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करून नळजोडही तोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक प्रांताधिकारी देवदत्त केकान यांनी दिली.

मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, कर अधीक्षक साळवे, कोल्हे, खान, सुपारे, ढाकणे, साखरे, छजलानी, हरिभाऊ शेकडे, मुरदारे व मनोज लांडे आदींच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe