ऊस तोडणी कामगाराची मुलगी बेपत्ता,शीघ्र कृती दलाकडून मुलीचे शोधकार्य सुरू !

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथून शुक्रवारी रात्री ऊस तोडणी कामगाराची साडेचार वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. ब्राम्हणी-वांबोरी या जुन्या मार्गावर असलेल्या ऊसतोडणी मजुराच्या थळात शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

मुलीच्या नातेवाईकांनी तसेच इतर ऊस तोडणी कामगारांनी परिसरात शोध घेतला. मात्र, तो व्यर्थ ठरला.याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी राहुरी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची खबर दिली. श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी रविवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

मुलीच्या तपासासाठी नगर येथील श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. रक्षा नावाच्या श्वानाने माग काढला. मात्र, तपास लागू शकला नाही. सध्या शीघ्र कृती दलाकडून मुलीचे शोधकार्य सुरू आहे. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक गणेश शेळके आदींसह राहुरी पोलिस ठाण्याचे व वांबोरी पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.