नामदार गडाखांचे सामन्यपण जनतेला भावले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-  मंत्री महोदय येणार म्हंटले कि, स्वागताची तयारी सर्व नियोजन पद्धतशीर पणे असावे अशा गोष्टी असतात. यातच जिल्ह्यातील एक आमदार आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेतच मात्र पुन्हा एकदा जनतेने त्यांचा साधेपणा पाहिला. मंत्री जेवण करणार म्हणून बंद खोलीत मोठा फौजफाटा लावून जेवणाची ‘शाही थाळी’ तयार होती.

परंतु नामदार शंकरराव गडाख यांनी या शाही जेवणाला टाळत सामान्य जनतेबरोबर जमिनीवर मांडी घालत पंगतीत जेवण करत आपल्या साधेपणातून मने जिंकली. मंत्रिपद मिळवूनही गडाख यांनी कुठलाही बडेजाव न ठेवता साधेपणा जपला.

नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या नूतन संचालकांचा सत्कार सोहळा होता. मंत्री झाल्यावर मला नामदार म्हणू नका आमदार म्हणा, असे शंकरराव गडाख अनेकदा जाहीर कार्यक्रमात सांगत असतात.

पद येतात जातात पण सामान्य जनतेच्या कामात झोकून देण्याला प्राधान्य द्या, असाही कानमंत्र शंकरराव यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe