उपमुख्यमंत्री म्हणातात त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांचे वीजबिल भरलेच पाहिजे

 

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- कृषिपंपांची वीजबिले भरण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना भरघोस सवलत दिली आहे. वीजबिलाची वसूल झालेली रक्कम त्या-त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विद्युत वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी वापरली जाणार आहे.

त्यामुळे अडचणीत आलेल्या महावितरणला टिकवायचे असेल तर शेतकऱ्यांनी वीजबिले भरलीच पाहिजेत. असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेत ना.पवार बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात कृषिपंपधारकांकडे ४५ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी राज्य शासनाने १५ हजार कोटी रुपयांचे व्याज व दंड माफ केला जाणार आहे.

उरलेल्या ३० हजार कोटींपैकी १५ हजार कोटींच्या बिलाचा भार राज्य सरकारने उचलला आहे. मराठवाड्यात १० हजार कोटींपैकी ५ हजार कोटींच्या वीजबिलाचा भार राज्य सरकारने उचलला आहे.

आता राहिलेले राज्याचे १५ हजार कोटींचे वीजबिल  वीजबिल टप्प्याटप्प्याने आता शेतकऱ्यांनी तातडीने भरले पाहिजे. शेतकऱ्यांची अडचण आहे याची आम्हाला कल्पना आहे म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांना काही काळापूर्वी कर्जमुक्ती दिली.

पाऊसकाळ बरा झालेला आहे. पिके चांगली आलेली आहेत. अशात शेवटी महावितरण कंपनीही टिकली पाहिजे. वीजबिलाच्या वसुलीतून जे पैसे जमा होणार आहेत,

ते त्या-त्या गावात आणि त्याच जिल्ह्यातल्या विद्युत वितरण यंत्रणेच्या पायाभूत विकासासाठीच महावितरणच्या माध्यमातून खर्च करणार आहोत, हे आम्हाला राज्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना आवर्जून सांगायचं आहे.

जिथे काही ट्रान्सफॉर्मर लागणार असतील, जिथे काही सबस्टेशन उभे करावे लागणार असतील, जे काही महावितरणचे काम असेल, त्यासाठी तो पैसा खर्च होणार आहे.

त्याच्यातून त्याच भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री  पवार यांनी केले आहे.