जितेंद्र आव्हाडांसारखा भाऊ कोणत्याच बहिणीला नको!

Ahmednagarlive24
Published:

मुंबई  – जितेंद्र आव्हाडांसारखा भाऊ नको असं म्हणत शिवसेनेच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघातील उमेदवार दिपाली सय्यद यांनी आव्हाडांवर निशाणा साधाला आहे.  तसेच जितेंद्र आव्हाडांविरोधात आपण कमीत कमी 20 हजार मतांनी निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यापूर्वी,  जितेंद्र आव्हाडांनी प्रचारादरम्यान दिपाली सय्यद यांचा माहेरवाशीण असा उल्लेख केला होता.  जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाकांकडे लक्ष दिलं नाही. कारण मी माझ्या प्रचारात व्यस्त होते. आव्हाडांना गाणं गायला आवडतं, त्यांच्यात एक अभिनेता लपलेला आहे. तो त्यांना लोकांना दाखवायचा असतो, त्यामुळे ते कॅमेऱ्यासमोर आले की गाणं गातात.

 आव्हाडांनी मला बहीण मानलं आहे आणि ते 15 दिवसात माझी हकालपट्टी करणार असं बोलत आहेत. त्यामुळे असा भाऊ कोणत्याच बहिणीला नको असतो, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं.
या निवडणुकीत मी शंभर टक्के जिंकणार आहे.

हे मी नाही तर कळवा-मुंब्रा परिसरातील लोक सांगत आहेत. कारण लोकांना याठिकाणी विकासासाठी बदल हवा आहे. मी याठिकाणी 20 हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जर मी निवडून आले तर याठिकाणी अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. मुंब्रा परिसरात लोक अंत्यत गलिच्छ परिसरात राहत आहे. मात्र तेथील स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप दिपाली सय्यद यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment