अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-पाथर्डी तालुक्यासह नगर राहुरी तालुक्यातील 45 गावांमधील 102 पाझर तलावासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या वांबोरी चारीसाठी या भागाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले.
पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावापर्यंत या योजनेचे पाणी पोहोचले असल्याची माहिती माजी सभापती संभाजी पालवे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पालवे यांनी सांगितले की, तीन महिन्यांपूर्वीदेखील मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले होते.
त्यावेळीदेखील अनेक पाझर तलाव व बंधाऱ्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साठवून राहिले व शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ झाला. आता पुन्हा एकदा मुळा धरणातून वांबोरी चारीला हक्काचे पाणी सोडावे, अशी मागणी कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांकडून मंत्री तनपुरे यांच्याकडे करण्यात आली होती.
त्यानंतर ना. तनपुरे यांनी मुळा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. वांबोरी चारी योजनेंतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे ६८० एमसीप्टी पाणी मिळणार असून, शंभर दिवस हे पाणी सुरू राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पाईपलाईन फोडू नये.
या योजनेतील शेवटच्या लाभधारक तलापर्यंत पाणी पोहोचणार असून, या पाण्यातून सर्वच तलाव व बांधारे भरले ज़ातील, असे संभाजी पालवे यांनी सांगितले. वांबोरी चारीला पाणी सुरू झाल्याने युवानेते देवेंद्र गीते, सुखदेव गीते, संदीप गीते, अशोक टेमकर, सरपंच विलास टेमकर, अंबादास औटी,
सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक, उपसरपंच दादासाहेब सरोदे, अजय पाठक, घाटशिरसचे सरपंच गणेश पालवे, उपसरपंच अलकाताई चोथे, राम पाठक, राम चोथे,यांच्यासह अनेक लाभधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले जात आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved