भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या शहराध्यक्षपदी संदीप हजारे यांची नियुक्ती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश या सामाजिक संघटनेच्या शहराध्यक्षपदी संदीप खंडू हजारे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांच्या हस्ते मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हजारे यांनी नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव हजारे, नगर तालुकाध्यक्ष युवराज हजारे, हरेश्‍वर साळवे, सचिन ठुबे, श्रीरंग रोहोकले, जगदीश आंबेडकर, अंबादास वाडेकर, संतोष भांड, भानुदास साळवे आदी उपस्थित होते. रघुनाथ आंबेडकर म्हणाले की, भ्रष्टाचार मुक्त भारतदेश घडविण्याच्या ध्येयाने भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश सामाजिक संघटना कार्यरत आहे. सामाजिक कार्य करणार्‍या युवकांना संघटनेत कार्य करण्याची संधी देण्यात आली आहे.

सर्वसामान्य नागरिकांना सरकारी व इतर कार्यालयात काम होण्यासाठी अडवणुक केली जाते. पिडीत व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवनिर्वाचित शहराध्यक्षपदी संदीप हजारे यांनी नागरिकांचे प्रश्‍न शासनस्तरावर सोडवण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून कार्य करणार आहे.

समाजाच्या शेवटच्या घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना व्यक्त केली. या निवडीबद्दल हजारे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe