अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- शहरातील सर्जेपुरा छबु पैलवान तालिम येथे अहमदनगर शहर कुस्ती तालीम सेवा संघाच्या वतीने रविवार दि.21 फेब्रुवारी रोजी 64 वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2020-21 स्पर्धेसाठी शहर निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी शहरातील कुस्तीगिरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहर कुस्ती तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नामदेव लंगोटे, कार्याध्यक्ष अजय आजबे, सचिव मोहन हिरणवाळे, उपाध्यक्ष सुनिल भिंगारे, खजिनदार कैलास हुंडेकरी यांनी केले आहे. या स्पर्धेचे शुभारंभ रविवारी सकाळी 11 वाजता मा. नगरसेवक संभाजी लोंढे, पै. संग्राम शेळके, ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, पै.विलास चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे.
स्पर्धेच्या दिवशी शहरातील मल्लांनी सकाळी 9 वाजता वजनासाठी उपस्थित रहावे. वजनानंतर कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेसाठी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी गटसाठी 86 ते 125 किलो वजनगट (गादी व माती) देण्यात आले आहेत. स्पर्धेला येताना खेळाडूंनी पासपोर्ट फोटो व आधारकार्ड सोबत आनणे आवश्यक आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved