अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रहिवासी ऋषिकेश विजय भागवत (वय ३०) या कोपरगाव येथील संजीवनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या तरुण प्राध्यापकाचा काल मंगळवारी (दिनांक १६ फेब्रुवारी) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सावळीविहीर येथे दुचाकी घसरल्याने भरधाव वेगाने येणारे अवजड वाहन अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
देवळाली प्रवरा येथील रहिवासी व कोपरगाव येथील संजीवनी पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्राध्यापक पदावर सन २०१३ पासून कार्यरत असलेले ऋषिकेश विजय भागवत हे आपल्या दुचाकीवरून कोपरगावकडे जात होते.
सावळीविहीर फाट्याजवळ त्यांची दुचाकी स्लीप झाली. याच वेळी जड वाहनाच्या मागील चाकाखाली सापडून त्यांचा जागेवर मृत्य झाला. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन मृतदेह पुढील प्रकियेसाठी दवाखान्यात पाठविला.
या अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन भरधाव वेगाने निघून गेल्याने त्याचा शोध लागलेला नव्हता. घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत. या घटनेने देवळाली प्रवरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ते देवळाली सोसायटीचे माजी सचिव कै. नारायण भागवत (परिटबाबा) यांचे नातू होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बंधू, मुलगा असा परिवार आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved