अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक खंडेराव सत्ताजी शिंदे यांचा अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
सुपा पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले शिंदे यांनी अनेक गुन्ह्यांमध्ये तपास करताना महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या कार्याची विशेष दखल घेत
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे हस्ते त्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला शिंदे यांनी कौशल्यपूर्ण मेहनत घेऊन वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी नोंदवली त्याबद्दल परिसरात कौतुक होत आहे
याप्रसंगी सूपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, उपनिरीक्षक चंद्रकांत खोसे, यशवंत ठोंबरे, अमोल धामणे, आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved