अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-नगर जिल्ह्याच्या विविध भागात काल मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळला.
या पावसामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा, कांदा तसेच द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात 18 तारखेला पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.
या जिल्ह्यासाठी यलो अलर्टही घोषित करण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास सोसाट्याच्या वार्यासह सायंकाळी व रात्री श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, राहुरी, नेवासा, कोपरगाव,
अकोलेत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस कोसळला. वादळामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
नगर व अन्य भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. या पावसाचा फटका उभ्या पिकांना बसणार आहे. नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved