फिर्याद दिल्याच्या कारणावरून चार एकर ऊस पेटवून दिला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-फिल्डमनला ऊस दाखवण्यासाठी घेऊन जात असताना रस्त्यात अडवून फिर्यादीच्या पतीस मारहाण केली.

याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचा राग मनात ठेवून सुमारे चार एकर खोडवा ऊस पेटवून देत तब्बल अडीच लाखाचे नुकसान केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे घडली आहे. याबाबत सविस्तर असे की,

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील मीनल मोहन भितांडे व त्यांचे पती तसेच फिल्डमन हे त्यांच्या पेडगावातील असलेल्या शेतात खोडवा ऊस दाखवण्यासाठी जात होते. यावेळी रूपचंद दत्तात्रय भितांडे ,

शिवम दत्तात्रय भितांडे (दोघे राहणार पेडगाव ता.श्रीगोंदा) यांनी मोहन भितांडे त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करून जखमी केले होते. मात्र मोहन भितांडे यांनी याबाबत पोलीस स्टेशनला फिर्यादी दिली,

याचा राग मनात ठेवून फिर्यादी मोहन भितांडे हे दवाखान्यात औषध उपचार घेत असताना वरील आरोपींनी फिर्यादीच्या मालकीचा सुमारे चार एकर ऊस पेटवून दिला.

तसेच जळालेला खोडवा ऊस चोरी करून श्रीगोंदा येथील कारखान्यावर रूपचंद दत्तात्रय भितांडे याने स्वतःच्या नावावर घातला आहे याबाबत मीनल मोहन भितांडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून वरील दोघांविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News