अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-सावेडीतील नाट्यगृहाचे काम गेल्या काही वर्षांपासून मंद गतीने सुरू आहे. नाट्यगृहासाठी येणारा खर्च आणि प्रत्यक्ष निधी यात मोठी तफावत असल्याने काम वेगाने होत नव्हते.
आ. जगताप यांनी निधी मिळविण्यासाठी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीला यश आले आहे.
सावेडीतील नाट्यगृहासाठी जवळपास नऊ कोटी रूपयांच्या निधीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृहासाठी निधी देण्यास मंजुरी दिली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आ. जगताप यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडे पाठपुरावा केला.
त्यानुसार नाट्यगृहासाठी जिल्हाधिकार्यांनी निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे नाट्यगृहासाठी आता आठ कोटी 98 लाख 66 हजार 545 रूपये एवढा निधी उपलब्ध झाला आहे.
आ. जगताप यांच्या प्रयत्नाने आणि सततच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेला हा निधी उपलब्ध झाला असल्याने आता एवढे वर्षे रखडलेले नाट्यगृहाचे काम वेगाने होण्याची गरज आहे. तातडीने अद्ययावत नाट्यगृह उभारून नगरकरांसाठी ते उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन आ. जगताप यांनी केले आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved