वीजपुरवठा खंडित; मनसेने महावितरणच्या अधिकाऱ्याला घेराव घातला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- महावितरण कंपनीने रोहीत्र बंद करून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

तर दुसरीकडे आक्रमक भूमिका घेतलेल्या महावितरणने थकीत शेती विज बिलाच्या वसुलीसाठी आता विज रोहीत्र बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे.

नुकतेच पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक, पळवे खुर्द, जातेगाव, गटेवाडी, घानेगाव, हंगा या पाच गावांचा तीन दिवसांपासून शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

यामुळे संतप्त झालेले मनसेच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरणचे अभियंता यांना घेराव घातला. सविस्तर माहिती अशी कि, वीजपुरवठा खंडित केल्याने पवार यांच्यासह शेतकर्‍यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्रेयश रूद्राकर यांच्या कार्यालयात आंदोलन केले. यंदा मुबलक पाऊस होऊन केवळ विजेअभावी पाण्याची कमतरता भासू लागली आहे.

याआधी जादा पावसाने ज्वारीचे पीक वाया गेले. थोड्याफार प्रमाणात कांदा, गहू, हरभरा, मका, घास, कडवळ आदी पिके दोन तीन पाण्यावर आली असताना महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. बळीराजा वीजबील भरायला तयार आहे.

फक्त त्यांना वेळ आणि ठराविक रक्कम टप्प्या टप्प्याने भरण्याची मुदत द्यावी, वीज पुरवठा सुरू केला नाही तर नगर- पुणे महामार्गावर सुपा येथील चौकात महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्यावतीने आंदोलन केले जाईल. याला महावितरण जबाबदार असेल असा इशारा दिल्यानंतर अभियंता रूद्राकर यांनी तात्काळ दखल घेऊन बंद केलेला वीजपुरवठा चालू केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe