11.39 :- जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डीचा अपवाद वगळता अन्य दहाही विधानसभा मतदारसंघात धक्कादायक असे निकाल लागण्याच्या मार्गावर आहेत. संगमनेरमधून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व शिर्डीतून भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाल्यात जमा आहेत.
दुसरीकडे पारनेरमधून राष्ट्रवादीचे निलेश लंके यांनी सेनेचे विजय औटी यांच्या विरोधात तगडी आघाडी घेतली आहे. लंके यांची ही आघाडी आता त्यांना निर्णायक विजय मिळवून देणारी ठरली आहे. कर्जत- जामखेडमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव दृष्टीपथात आहे.

रोहित पवार यांनी आतापासूनच मतदारांचे आभार मानण्यास प्रारंभ केला आहे. राहुरीतून शिवाजी कर्डिले यांची विकेट गेल्यात जमा आहे.
प्राजक्त तनपुरे यांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. नेवासामधून क्रांतीकारीचे शंकरराव गडाख यांची ‘क्रांती’ यशस्वी झाली. श्रीरामपूरमधून कॉंग्रेसचे लहू कानडे हे विजयाच्या मार्गावर आहेत.
नगर शहरात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर आहेत. पाथर्डी- शेवगावमध्ये चुरस आहे. कधी ढाकणे लीडवर दिसतात तर कधी राजळे! अकोलेमध्ये पिचड पिछाडीवर पडले असून राष्ट्रवादीचे लहामटे तब्बल १६ हजार मतांनी आघाडीवर आहेत. श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते व घनश्याम शेलार यांच्यातील चुरस कायम आहे.
10.54 :- अहमदनगर जिल्ह्यात भाजपची वाताहत झाली असून १२ पैकी फक्त दोन जागेंवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत कर्जत-जामखेड, पारनेर, शेवगाव, अहमदनगर, राहुरी, अकोले, कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्यात मोठा बोलबाला झाला असताना अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे केवळ दोन उमेदवार आघाडीवर असून अपेक्षेप्रमाणे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील व श्रीगोंदे मतदारसंघातून बबनराव पाचपुते आघाडीवर आहेत.
तिसऱ्या फेरीनंतर पाचपुते २३०६ मतांनी आघाडीवर आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील तिसऱ्या फेरीनंतर १४ हजार ३८३ मतांनी आघाडीवर आहेत.
10.53 :- Live Updates : कर्जत – जामखेड मध्ये रोहित पवारांचं सेलिब्रेशन सुरु !
कर्जत-जामखेड, पारनेर, शेवगाव, अहमदनगर, राहुरी, अकोले, कोपरगाव मतदारसंघातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
कर्जत जामखेड – रोहित पवार (राष्ट्रवादी)
पारनेर- निलेश लंके (राष्ट्रवादी)
श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)
नगर शहर – संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
राहुरी- प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)
शेवगाव- प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी)
नेवासा- शंकरराव गडाख (राष्ट्रवादी पुरस्कृत)
शिर्डी- राधाकृष्ण विखे (भाजप)
संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
कोपरगाव – अशुतोष काळे (राष्ट्रवादी)
अकोले- किरण लहामटे (राष्ट्रवादी)
श्रीरामपूर- लहू कानडे (काँग्रेस)
- Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद
- BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा, लाखो रुपयांचा खर्च वाचणार, पहा…
- घरात साप शिरला तर घाबरू नका, फक्त ‘हे’ उपाय करून पहा, साप असा पळणार की परत मागे फिरणार पण नाही