अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-भरधाव वेगातील ट्रकची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नगर तालुक्यातील जखणगाव शिवारात घडली.
नवनाथ रामभाऊ काळे (वय ४० रा.निमगाव घाणा) यांचा मृत्यू झाला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील जखणगाव शिवारात भरधाव वेगात आलेल्या ट्रक (एमएच२०डीई ३८०७) च्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ट्रक चालवत येथील जीओ टॉवरसमोर टिव्हीएस स्टार कंपनीच्या मोटारसायकलला(एमएच १६ सीबी ८४७०) जोराची धडक दिली.
यात नवनाथ रामभाऊ काळे यांचा जखमी होवून मृत्यू झाला. याप्रकरणी बाळू रामभाऊ काळे याने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरून पोलिसांनी ट्रकचालक शिवबहादूर लालबहादुर (रा.मेझा.जि. इलाहाबाद,उत्तरप्रदेश) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोहेकॉ.धुमाळ हे करत आहेत.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved